1.जागतिक महिला दिनानिमित्त "संकल्प- सेवा तर्फे" अभिनव उपक्रमाचे आयोजन.
2."संकल्प सेवा बहुउद्देशीय" संस्थेद्वारे दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय आणि पोलीस स्टेशन दर्यापूर येथे सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
1."संकल्प मराठी भाषा युवक मंडळ दर्यापूर"यांच्यातर्फे "मराठी भाषा गौरव दिनानिमित्त"कार्यशाळेचे आयोजन.
2.निक ग्रामपंचायत टोंगलाबाद येथे राष्ट्रीय सेवा योजना जे . डी पाटिल सांगळूदकर महाविद्यालय यांच्या शिबिरा मधील विद्यार्थ्यांसाठी आणि उपस्थित प्राध्यापकांसाठी मराठी भाषा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
1."छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या 395 व्या जयंती दिनानिमित्त 'संकल्प सेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे 'अभिनव उपक्रमाचे आयोजन.
2."छत्रपती शिवाजी महाराज" जयंती उत्सवानिमित्त दर्यापूर येथील शिवप्रेमी महिलांनी शोभा यात्रेचे आयोजन केले होते सदर शोभयात्रेला रामायण सेवा समिती हॉल दर्यापूर येथून सुरुवात झाली .शोभायात्रेच्या सुरुवातीला स्थानिक "संकल्प सेवा बहुउद्देशीय संस्था" दर्यापूर यांच्यावतीने उपस्थित महिलांना तसेच विद्यार्थ्यांना आणि उपस्थित नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
1.भारतीय संविधानावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संत तुकाराम इंग्लिश मीडियम स्कूल दर्यापूर मुख्याध्यापिका सौ चौखंडे मॅडम यांचा गौरव करताना अमरावती जिल्ह्याचे खासदार मा. श्री बळवंत भाऊ वानखडे आणि संकल्प सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रसाद बावनेर.
2.संविधान स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना मान्यवर.
1.सर्वोदय हायस्कूल कोकर्डा तालुका अंजनगाव सुर्जी, "भारतीय संविधानावर"आधारित सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले, पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांसोबत शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील लव्हाळे सर, संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रसाद बावनेर संस्थेचे आजीवन कार्यकारणी सदस्य श्री सागर साखरकर .आणि इतर सर्व शिक्षक वृंद.
1.मराठी भाषा पंधरवडा उपक्रमामध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मुख्याध्यापिका सौ पवित्रकार मॅडम जिल्हा परिषद शाळा साईनगर दर्यापूर यांना सन्मानित करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद बावनेर आणि इतर सहकारी.
1.कै. काशिबाई अग्रवाल विद्यालय येवदा येथे सावित्री फुले जयंती निमित्य सामान्य ज्ञान परिक्षेचे आयोजन व बक्षिस वितरण . कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य आर एन बोरोळे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रसाद बावनेर , परवेज खान , रोशन भांगे.
1.जिल्हा परिषद शाळा पिंपळगव्हाण तालुका अंजनगाव सुर्जी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण करत असताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भारती देठे मॅडम आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रसाद बावनेर तसेच विद्यार्थी आणि इतर शिक्षक कर्मचारी.
1.सर्वोदय हायस्कूल कोकर्डा तालुका अंजनगाव सुर्जी, "भारतीय संविधानावर"आधारित सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले, पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांसोबत शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील लव्हाळे सर, संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रसाद बावनेर संस्थेचे आजीवन कार्यकारणी सदस्य श्री सागर साखरकर .आणि इतर सर्व शिक्षक वृंद.
1.संकल्प सेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे "ताण तणाव व्यवस्थापन"विषयावर महिलांसाठी कार्यशाळेचे आयोजन, मार्गदर्शन करताना, डॉ प्रसाद बावनेर.
1.श्री राम मंदिर कळाशी येथे स्तनांच्या कर्करोगावर मार्गदर्शन शिबीर संपन्न . प्रमुख मार्गदर्शक डॉ .रुपेश काळे डॉ प्रसाद बावनेर, श्री हर्षद कावनपुरे ,गावातील सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
1.सामान्य ज्ञान स्पर्धा विषय भारतीय संविधान यशस्वी आयोजन आणि उत्स्फूर्त सहभागाबद्दल प्राचार्य श्री आर एन बोरोळे यांना सन्मानित करताना संस्थेचे कोषाध्यक्ष श्री हर्षद कावनपुरे आणि श्री आकाश साखरकर आणि इतर शिक्षक वृंद.
1.जिल्हा परिषद शाळा साईनगर दर्यापूर येथे मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त कथाकथन स्पर्धेचे आयोजन तसेच लेखन स्पर्धेचे आयोजन.
1.ज्ञानपीठ कॉन्व्हेंट दर्यापूर येथे मराठी भाषा पंधरवडा निमित्त लेखन स्पर्धा आणि मराठी भाषा फलकाचे वितरण.
1.संत तुकाराम इंग्लिश स्कूल साईनगर दर्यापूर येथे संविधान दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन.
2.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान स्पर्धेचे आयोजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
3.संत लहानुजी महाराज विद्यालय चितलवाडी ता . तेल्हारा जि . अकोला येथील विद्यालयात संविधानाच्या उद्देश्य पत्रिकेचे सामूहिक वाचन.
1.काशीबाई अग्रवाल विद्यालय येवदा येथे संविधान दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न.
2.सर्वोदय विद्यालय कोकर्डा येथील मुख्याध्यापक श्री सुनील लव्हाळे सर यांना निवेदन देताना संस्थेचे पदाधिकारी डॉ प्रसाद बावनेर आणि श्री अमित आगलावे.
3.संविधानावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धेविषयी मार्गदर्शन करताना संस्थेचे पदाधिकारी डॉ . प्रसाद बावनेर महर्षी वाल्मिकी विद्यालय समदा येथे संविधान स्पर्धेचे आयोजन.
1.महर्षी वाल्मिकी विद्यालय समदा येथे संविधान स्पर्धेचे आयोजन.
2.मतदानाची टक्केवारी वाढावी या हेतूने संकल्प सेवा संस्थेतर्फे मतदार जनजागृती उपक्रम आणि मतदान करण्याचे आवाहन.
1.संकल्पासेवा बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य पुणे येथे स्थित श्री तुषार बाबाराव पाटील व त्यांच्या पत्नी सौ अंकिता तुषार पाटील यांनी श्री तुषार बाबाराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रस्त्यावरील गरीब व गरजू लोकांना अन्नदान व अंगावरील चादर वाटप करून वाढदिवस साजरा केला. असे अनेक संकल्प घेऊन संकल्पसेवा बहुउद्देशीय संस्था, दर्यापूर सतत कार्यरत राहण्याचा प्रयत्न करीत.
1.वैकुंठ भूमी भवानिवेश दर्यापूर येथे दीपोत्सवाचे आयोजन.
2.स्मशानभूमीची काळजी वाहणारे आणि स्वच्छता राखणारे गणेश भाऊ यांचा सपत्नीक सत्कार करताना मा . खासदार श्री बळवंत भाऊ वानखडे (अमरावती).
3.मा .खासदार श्री बळवंतभाऊ वानखडे यांच्याशी चर्चा करतांना संकल्पसेवा संस्थेचे पदाधिकारी डॉ प्रसाद बावनेर , श्री अकाश साखरकर.
1.संकल्प सेवा बहुउद्देशीय संस्था दर्यापूर यांच्यातर्फे जे डी पाटील सांगळूदकर महाविद्यालय दर्यापूर येथे सिकलसेल ऍनिमिया ची चाचणी करण्यात आली चाचणी दरम्यान उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी.
2.संकल्प सेवा बहुउद्देशीय संस्थेद्वारा आयोजित सिकलसेल ऍनिमिया च्या चाचणी कॅम्पला प्राचार्य श्री अतुल बोडखे , डॉ .वसंतराव टाले प्रा . जयस्वाल .डॉ .निवृत्ती बागलकर आणि इतर प्राध्यापक वर्ग यांची सदिच्छ भेट.
1.संकल्पसेवा बहुद्देशीय संस्थे तर्फे स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत मोहत्सवा निमित्य प्रसाद बावणेर सर यांच्या क्लास वर संकल्पसेवा बहुद्देशीय संस्थे तर्फे सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली व त्या स्पर्धे चे पारितोषिक वितरण करण्यात आले
तसेच या कार्यक्रमाला प्रमूख अतिथी डॉ सचिन नागे व डॉ रुपेश काळे आणि शास्त्रज्ञ डॉ निवृत्ती बागलकर सर इत्यादी मान्यवर उपस्तीत होते आणि हा कार्यक्रम 15 ऑगस्ट 2022 रोजी पार पडला.
2.एमपीएससी परीक्षे मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या श्री अविनाश धोटे यांचे गुणगौरव करताना संकल्प सेवेची पदाधिकारी श्री अमित कुटेमाटे.
1.रस्ते सुरक्षा अभियान या अंतर्गत आयोजित पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करताना तहसीलदार डॉ योगेश देशमुख साहेब ठाणेदार श्री प्रमेश अत्राम साहेब आणि संकल्प सेवा संस्थेचे पदाधिकारी.
2.रस्ते वाहतूक आणि सुरक्षितता अभियान आणि रहदारी नियंत्रण यासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यासाठी संकल्प सेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे दर्यापूर पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर करताना संस्थेचे पदाधिकारी श्री हर्षद कावनपुरे श्री अमित कुटेमाटे श्री गणेश माने.
3.रहदारीचे नियम समजावून सांगताना आणि पथनाट्य सादर करत असताना पथनाट्यातील सहभागी विद्यार्थी.
4.पथनाट्यात सहभागी विद्यार्थी आणि त्यांचे सादरीकरण.